Tuesday, 27 May 2014

निसर्गशिल्प — "सांदण दरी"

वैविध्यतेने नटलेल्या आपल्या महाराष्ट्रात भटकंतीच्या दृष्टीने जे पाहिजे आहे ते सर्वच आहे. एकिकडे सह्याद्रीचे उत्तुंग शिखरं आहे तर दुसरीकडे मन मोहविणारे समुद्रकिनारे, निसर्गनिर्मित चमत्कार तसेच मानवनिर्मित चमत्कारही. इथे प्राचीन कोरीव लेणी आहेत आणि विविधतेने नटलेली वन्यसंपदाही. महाराष्ट्रातील काही भागात तर निसर्गाने नाजुक आणि रौद्र सौंदर्याची मुक्तहस्ताने उधळण केली आहे. त्यातीलच एक भाग म्हणजे भंडारदरा आणि परीसर. येथे दुर्गमतेचे बिरूद मिरवणारे अलंग, मलंग आणि कुलंग हे दुर्ग त्रिकुट आहे, एकीकडे आकाशला गवसणी घालणारे कळसुबाई शिखर तर दुसरीकडे थेट पाताळाचा वेध घेणारी सांदण दरी. भंडारदरा धरण, किल्ले रतनगड, अमृतेश्वर मंदिर अशी अनेक ठिकाणे आपली या भागातली भटकंती अविस्मरणीय करतात. या भागातील भटकंती सगळ्या ऋतुत मनाला आनंद देणारी ठरते. पावसाळ्यात तर येथे स्वर्गच उतरतो.
कवी माधव यांच्याच शब्दात सांगायचे तर...

"हा इकडे सह्याचळ, हे इकडे सागरजळ, हे वरी नभोमंडळ
आणि खाली पाताळसम खोल दरीचा तळ!
 
अशाच एक पाताळसम खोल दरी म्हणजे आजच्या भेटीचे ठिकाण "सांदण दरी". सांदण दरीबद्दल योरॉक्स, रोहित एक मावळा, Discoverसह्याद्री, डोंगरवेडा मायबोलीकर मित्रांनी  (सचित्र) भरभरून लिहिलंय. त्यामुळे मी जास्त काही लिहित नाही. मला प्रत्येकाच्या प्रचित दिसणारी सांदण दरी नेहमीच वेगवेगळी भासली आणि प्रत्यक्षात तर अजुनच वेगळी. थोडक्यात काय तर "जो बात तुझमें है तेरी तस्वीरमें नही...". खरंतर प्रत्यक्ष जाऊन भेट द्यावी अशीच हि जागा.

महाराष्ट्रात पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगांनी अनेक निसर्गलेणी तयार केलेली आहेत. सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावर ४ महीने कोसळणार्‍या धुवाधार पावसामुळे नद्या नाले दुथडी भरून वहातात. त्यांच्या रोरावत जाणार्‍या पाण्यामुळे सह्याद्रीचे कातळ कडे कापले जातात आणि अनेक अजोड निसर्गशिल्प तयार होतात. अशा प्रकारचे निसर्गशिल्प "सांदण" येथे तयार झालेले पहायला मिळते. या ठिकाणी वहाणार्‍या नदीच्या पाण्याच्या प्रवाहाने लाखो वर्षे कातळकडे तासून त्यातून मार्ग काढलेला आहे. त्यामूळे काही ठिकाणी नदीच्या पात्राची रूंदी 7-8 फूट असूनही वरच्या बाजूचे कातळकडे एकमेकाला जोडलेले आहेत. या निसर्गशिल्पात भर पडलेली आहे ती कातळ भिंतीं मधून तुटून पडणार्‍या खडकांची. उन्हाळ्यात तापलेल्य़ा खडकावर/ कातळभिंतींवर जेंव्हा पावसाचे थंड पाणी पडते, तेंव्हा त्यांना मोठया भेगा पडतात. या भेगांमध्ये पावसाचे पाणी शिरून त्याच्या रेट्याने मोठ- मोठे खडक कातळभिंतीतून वेगळे होऊन नदीच्या पात्रात पडतात.हे सर्व घडून येण्यासाठी अनेक वर्षे जावी लागतात.
(माहिती साभारः http://trekshitiz.com)
प्रचि ०१

 
"अलंग, मदन, कुलंग" हि दिग्गज मंडळी जमली एकाच ठिकाणी सारी
"बारी" गावच्या "कळसुबाई"ची तर बातच न्यारी
साम्रद गावातील "सांदण दरीत" पाहिली निसर्गाची कमाल
"भंडारदरा" परीसरात पुन्हा एकदा भटकंतीची धम्माल"
 
मे महिन्यात भंडारदरा परीसरातील साम्रद गावातील सांदण दरीचे निसर्गनवल पाहुन आलो. हि दरी जमिनीच्या खाली साधारण १००-१५० फूट खोल आणि १-२ किमी अंतराची आहे. थोडक्यात जमिनीला पडलेली प्रचंड भेग. या ठिकाणी खालपर्यंत सूर्यकिरण पोहचत नसल्यामुळे घळीत कमालीचा गारवा जाणवतो त्यामुळे वैशाख वणव्यातही सांदण दरीची भटकंती सुसह्य ठरते. दोन ठिकाणी पाण्यातुन पुढे जावे लागते (सूर्यकिरण खालपर्यंत पोहचत नसल्याने येथील पाणी कधीही आटत नाही). सामद्र गावातुन दिसणार्‍या सह्याद्रीच्या रांगा तर केवळ अप्रतिम. या सार्‍या परीसराची भटकंती करताना मनोमन जाणवते कि निसर्गापुढे माणुस किती खुजा आहे ते.
या परीसरात "सह्याद्री सुंदरी" म्हणजेच "अंजनीची" झाडे प्रचंड प्रमाणात आढळली, नुकतंच अंजनीच्या बहराला सुरूवात झाली आहे. करवंदाच्या जाळ्याही जागोजाग होत्या, थोडीफार पिकलेली करंवद दिसली, तोडली आणि खाल्ली. अहाहा! काय तो स्वाद!!. आंब्याच्या झाडावरच्या कैर्‍याही पाडल्या. सह्याद्रीच्या कुशीत भटकुन आल्यावर उद्दिपीत झालेल्या जठराग्नीला शांत करण्यासाठी गावातल्याच एका अन्नपूर्णेने वाढलेल्या पिठलं भाकर, हिरवी मिरची-शेंगदाण्याचा झणझणीत ठेचा, तिखटमीठ लावलेल्या कैर्‍या, चुलीत खरपूस भाजलेला पापड, घरच्या तांदुळाचा मऊसुत भात आणि गरमागरम तुरीच्या डाळीच्या वरणाची आहुती दिली.
अलंग, मदन, कुलंग हे दुर्गम दूर्ग त्रिकुट, महाराष्ट्रातील एव्हरेस्ट "कळसुबाई", निसर्ग नवल "सांदण दरी", रौद्रभीषण सह्यकडे यांनी हा सारा परीसर सजलेला/नटलेला आहे.
प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७
कोकणकडा

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११
आंबट चिंबट करवंद स्मित

प्रचि १२
"सह्याद्रीसुंदरी अंजनी"च्या कळ्या आणि फुले

प्रचि १३

प्रचि १४

सांदण दरीकडे जाणारी वाट
प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

रतनगड, खुट्टा आणि सांदण दरी
प्रचि ३०

अलंग, मदन आणि कुलंग
प्रचि ३१

प्रचि ३२