Thursday, 12 June 2014

कुठं कुठं जायचं "भिजायला"...

ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं !
भरं ऊन्हात पाऊस घेवुन आभाळ मनात दाटतं
तरी पाऊलं चालत रहातात, मनं चालत नाही
घामाशिवाय शरिरामधे कुणीच बोलत नाही
तितक्यात कुठुनं एक ढग सुर्यासमोर येतो,
ऊन्हामधला काही भाग पंखाखाली घेतो…
वारा ऊनाड मुलासारखा सैरावैरा पळत रहातो…..
पानाफुला, झाडांवरती छपरावरती चढुन पहातो……..
दुपार टळुन संध्याकाळचा सुरु होतो पुन्हा खेळ…
ऊन्हामागुन चालत येते, गारं गारं कातरवेळ…
चक्क डोळ्यांसमोर ॠतु कुसं बदलुन घेतो
पावसाआधी ढगांमधे कुठुन गारवा येतो………

कवी सौमित्रांची हि कविता आजहि ऐकली कि भर उन्हात गारव्याची जाणीव होते.

पा ऊ स - तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्‍या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. अशा या पाऊसवेड्यांमध्ये हिरव्या ऋतुत मनसोक्त भटकंती करणार्‍या पर्यटकांचाही समावेश होतो आणि भिजून चिंब करणार्‍या ठिकाणाला भेटी द्यायच्या याद्या तयार होऊ लागतात.
आता तुम्ही म्हणत असाल कि, बाहेर एव्हढे कडक ऊन आहे, पावसाचा अजुनही पत्ता नाही, अंगाची लाही लाही होत आहे आणि याने काय हे पावसाचे लावले आहे. अहो, म्हणुनच तर........ डोळ्यांना थोडासा गारवा देण्यासाठीच तर हा फोटोप्रपंच!!!!
काहि दिवसातच पावसाला सुरुवात होईल तो पर्यंत तुम्ही सुद्धा या पावसाळ्यात कुठे जायचे ते प्लानिंग करून ठेवा. आयत्यावेळी शोधाशोध करण्यात संपूर्ण पावसाळा निघुन जाईल.

चला तर मग आज  मुंबई-पुण्याच्या जवळपास असलेल्या धबधब्यांच्या सफरीच्या आनंद मराठी "पाऊसगाणी" गुणगुणंत लुटुया.

प्रचि ०१
आला पाऊस मातीच्या वासात ग, मोती गुंफीत मोकळ्या केसांत ग
आभाळात आले काळे काळे ढग,धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत ग, मोती गुंफीत मोकळ्या केसांत ग....


प्रचि ०२
सुख पावसापरी यावे, आयुष्य अन्‌ हे भिजावे,
स्पर्शून आसवांना ह्या मातीत ओल्या रुजावे
जरी दाटले आभाळ हे तरी नवा रंग हो...घन आज बरसे मनावर हो...


(ठोसेघर धबधबा)
प्रचि ०३
चिंब पावसानं रानं झालं आबादानी, झाकू कशी पाठीवरली, चांदणं गोंदणी
झाकू नको कमळनबाई एकांताच्या कोनी, रूपखनी अंगावरली, सखे लावण्याची खाणी


प्रचि ०४
खुळ्या खुळ्या रे पावसा, किती भिजविसी मला
नाही नाही म्हणताना मीही कवळिले तुला


(विहिगाव धबधबा)
प्रचि ०५
घन ओथंबून येती, बनांत राघू फिरती
पंखावरती सर ओघळती, झाडांतून झडझडती


प्रचि ०६
आली आली सर ही ओली खुलवित धुंद अशी बरसात
छुम्‌ छुम्‌ पैंजण पायी बांधून सजले मी दिनरात
आली आली सर ही ओली


(इगतपुरी)
प्रचि ०७
अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले
दाटुनी आभाळ आले मेघ बरसू लागले
अशा चिंब ओल्या क्षणी, पुकारे तुझी साजणी


प्रचि ०८
घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा
केकारव करी मोर काननी उभवून उंच पिसारा


प्रचि ०९
ये रे घना, ये रे घना, न्हाउ घाल माझ्या मना
फुले माझि अळुमाळु, वारा बघे चुरगळू
नको नको म्हणताना गंध गेला रानावना


(माळशेज घाट)
प्रचि १०
आषाढाला पाणकळा, सृष्टी लावण्याचा मळा
दु:ख भिरकावुन येती शब्द माहेरपणाला
शब्द माहेरपणाला, नवा गांधार जिण्याला
मेघुटांच्या पालखीला, डोळे गेले आभाळाला
जाईजुईचा गंध मातीला, हिरव्या झाडांचा छंद गीताला


प्रचि ११
बरस रे घना
तूच आज शमवी तृषीत माझिया मना


प्रचि १२
हा उनाड अवखळ वारा, या टपोर श्रावणधारा
फुलवून पिसारा सारा तू नाच आज रे मोरा


प्रचि १३
ए आई मला पावसात जाउ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होऊ दे


प्रचि १४
तुझ्यामाझ्या सवे कधी गायचा पाऊसही
तुला बोलावता पोचायचा पाऊसही


प्रचि १५
नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं हिरव्या बहरात


(लवासा)
प्रचि १६
सोसाट्याचा आला वारा सरसर आल्या धारा, भिजुनिया देह चिंब झाला गं
सजणीला भेटायाला साजनाने यावं तसा सांज वेळी पाऊस आला गं


प्रचि १७
पाऊस असा रुणझुणता पैंजणे सखीची स्मरली
पाऊल भिजत जाताना चाहूल विरत गेलेली


प्रचि १८
पाऊस आला, वारा आला, पान लागले नाचू
थेंब टपोरे गोरे गोरे, भर भर गारा वेचू


(भंडारदरा)
प्रचि १९
कधी रिमझीम झरणारा आला ऋतू आला
कधी टपोर्‍या थेंबांचा आला ऋतू आला


प्रचि २०
पावसात नाहती लता लता कळ्या फुले
सुगंध धुंद रात ही आज राज्य आपुले


प्रचि २१
उनाड पाऊस, अशांत पाऊस, अधीर भिरभिणारा पाऊस
निरोप घेऊन आभाळाचा भटके हा बंजारा पाऊस


प्रचि २२
गडद जांभळं भरलं आभाळ
मृगातल्या सावल्यांना बिलोरी भोवळ
खोलवरी चिंब बाई मातीला दरवळ


प्रचि २३
आला आला वारा संगे पावसाच्या धारा
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा


प्रचि २४
घन बरसत बरसत आले
वनि मोरांचा षड्ज लागला, झाडांतुन मल्हार जागला
मन चकित, सुगंधित झाले


प्रचि २५
या रिमझिम झिलमिल पाऊसधारा तनमन फुलवून जाती
सहवास तुझा मधुमास फुलांचा गंध सुखाचा हाती
हा धुंद गार वारा, हा कोवळा शहारा, उजळून रंग आले, स्वच्छंद प्रीतीचे
चिंब भिजलेले, रूप सजलेले, बरसुनी आले रंग प्रीतीचे


प्रचि २६
जो काल इथे आला तो पाऊस वेगळा होता
आभाळ निराळे होते, तो मेघ वेगळा होता


प्रचि २७
झुंजुर-मुंजुर पाउस मार्‍यानं अंग माझं ओलं चिंब झालं रं
टिपुर टिपुर पाण्याची घुंगरं हिरव्या हिरव्या धरेवरी आली रं
बेगिन ये, साजणा...


प्रचि २८
दूरदूर नभपार डोंगराच्या माथ्यावर
निळेनिळे गारगार पावसाचे घरदार
सरीवर सर .... सरीवर सर ....


प्रचि २९
अग्गोबाई ढग्गोबाई लागली कळ
ढगाला उन्हाची केवढी झळ, थोडी न्‌ थोडकी लागली फार
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार


(माळशेज घाट)
प्रचि ३०
पावसा ये रे पावसा, दे जिवाला दे भरवसा
देते कधीची तुला हाक माझी तृषा


प्रचि ३१
ढग दाटूनि येतात, मन वाहूनी नेतात
ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी जातात
झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची
सर येते ...... माझ्यात


जीव होतो ओला चिंब, घेतो पाखराचे पंख
सार्‍या आभाळाला देतो एक ओलसर रंग
शब्द भिजूनि जातात अर्थ थेंबांना येतात
ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात


5 comments:

 1. Photo pahun gaar vatayala lagle

  ReplyDelete
 2. योगेश, खूपच छान! :)
  अरे किती ते फ़ोटो धबधब्याचे? तू म्हणजे एक कमालच आहेस. असं वाटलं, प्रत्येक धबधब्याखाली चिंब भिजावं. :)

  ReplyDelete
 3. खूपच सुंदर योगेश………

  ReplyDelete
 4. Khoop chan pics aani poem aahet, chan vatale vachun

  ReplyDelete