निसर्गसृष्टीचा आनंद मनमुराद लुटायचा असेल तर घराबाहेर पडाव लागत आणि
एकदा घराबाहेर फिरायचे म्हटलं कि नवीन स्थळ शोधाव. एकदा का त्या इच्छित
स्थळी पोहचलो कि तेथे काय पहाव हे स्वत:च्या आवडीनुसार ज्याने त्याने
ठरवावे. मला "समुद्रकिनारी" गेल्यावर जास्त काय पहायला आवडतं तर सूर्यास्त
आणि त्यानंतर क्षितिजावर होणारी रंगांची उधळण. प्रत्येक ठिकाणच्या
सूर्यास्तात वेगळेपणा असतो. फक्त "नजर" पाहिजे तो पाहण्याची, अनुभवण्याची.
दरवेळेस असंच होत. सायंकाळची विलोभनीय वेळ, रूपेरी वाळुचा मऊशार
समुद्रकिनारा, आकाशात बदलत जाणारे रंग, विविध छटा, पाण्यावर उमटणारे
प्रतिबिंब, माझी पावलं नकळत त्या ओल्या मऊशार वाळुत खेचली जाऊ लागतात.
एरव्ही स्वत:कडे कुणाला पाहुही न देणारा हा तेजाचा गोळा हळुहळु आपलं रूप
बदलु लागतो. त्याचा लालबुंद आणि भव्य आकार सहज स्पष्ट दिसू लागतो. सूर्य
हळुहळु खाली येऊ येतो. माझी पर्यायाने कॅमेर्याची नजर फक्त आणि फक्त
त्याच्याकडेच असते. अगदी काही वेळातच भव्य व लोभस सूर्याचा लालबुंद गोळा
पाण्याजवळ येतो. त्याचं पाण्यातलं प्रतिबिंबही तेव्हढंच लोभस. पाहता पाहता
सूर्याचा अस्ताला जातो. जाता जाताही तो आकाशावर विविध रंगाच्या छटा ,
वेगवेगळ्या आकाराच्या रंगीबेरंगी रांगोळ्या काढुन जात असतो. निसर्गाचा हा
अविष्कार डोळ्यात साठवू कि कॅमेर्यात अशी संभ्रमावस्था नेहमीच माझी होत
असते. अगदी काळोख होईपर्यंत निसर्गाचा हा खेळ सुरू असतो.
हा सारा सोहळा अनुभवत असताना नकळत कुसुमाग्रजांच्या कवितेतील या ओळी ओठावर येतात.
हा सारा सोहळा अनुभवत असताना नकळत कुसुमाग्रजांच्या कवितेतील या ओळी ओठावर येतात.
आवडतो मज अफ़ाट सागर, अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे
क्षितिजावर मी कधी पाहतो मावळणारा रवी,
ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी
प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी
निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे
क्षितिजावर मी कधी पाहतो मावळणारा रवी,
ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी
प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी
सुंदर!!!
ReplyDeleteव्वा! काय अफ़लातून आलेत फ़ोटो. :)
ReplyDeleteयोगेश, ब्लॊग केलास ते खूपच छान झालं. आता सगळे छान छान फ़ोटो इथे एकाच ठिकाणी पहायला मिळतील. धन्यवाद!
Superb Yogesh..:)
ReplyDeleteClassic
ReplyDeletemast re... kahi snaps atisundar .. :) pan ek suggestion.. it would be better to name the beaches..!
ReplyDeleteप्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद!!!!
ReplyDeleteयो, अरे सगळे कोकणातील समुद्रकिनारे आहेत. :-)