Tuesday, 13 June 2017

भटकंती पुरेपुर @ कोल्हापूर


 खिद्रापूर
महाराष्ट्रातील खजुराहो अशी ओळख होईल इतके सुंदर आणि अप्रतिम मंदिर म्हणजेच खिद्रापुर येथील कोपेश्वर मंदिर. कोल्हापुर जिल्ह्यापासुन साधारण ६५ किमी अंतरावर कृष्णा नदीच्या काठी वसलेले खिद्रापुरचे कोपेश्वर मंदीर हे स्थापत्य रचनेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. इथल्या महादेवाचे नाव कोपेश्वर. अर्थातच रागावून इथे येऊन बसलेला. दक्ष कन्या सतीच्या जाण्याने, तिच्या विरहाने कोपलेला महादेव कोपेश्वर. मग साहजिकच त्याची समजूत काढण्यास कुणीतरी हवे. ते काम श्री विष्णूनी केले त्यांचे नाव धोपेश्वर. मंदिराच्या गर्भगृहात दोन शाळुंका आहेत. या मंदिराचे खरे सौंदर्य त्याच्या रचनेत आहे. छोटय़ाशा दरवाजातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश झाल्यावर समोर कित्येक शतकांचा इतिहास उलगडत जातो. देवळाबाहेर ४८ खांबांवर तोललेला एक मंडप आहे.या मंडपाला छत नाही. संपूर्ण वर्तुळाकार जागा मुद्दाम रिकामी ठेवण्यात आली आहे. या मंडपाचा वापर यज्ञकार्यासाठी होत असे. त्यामुळे होम-हवनाचा धूर बाहेर जाण्यासाठीची ती जागा आहे.
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५
 नरसोबाची वाडी
नृसिंहवाडी (पर्यायी नावे: नरसोबावाडी/नृसिंहवाडी) हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील गाव. कृष्णेच्या प्रशस्त अशा घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली मंदिर आहे. मंदिरातच नृसिंह सरस्वती स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तपादुका आहेत. वाडीहून गाणगापूरला जाताना योगिनींच्या आग्रहावरून स्वामींनी वालुकामय पाषाणाच्या या पादुकांची स्थापना केली. त्यावरील सततच्या अभिषेकाने त्या झिजत नाहीत. म्हणून त्याची घडण चंद्रकांत पाषाणाची असावी असे म्हणतात.
(Souce: Wiki)
प्रचि ०६
 कृष्णाकाठचा सूर्योदय
प्रचि ०७
 श्री महालक्ष्मी मंदिर
प्रचि ०८
 पंचगंगा नदीकाठ
प्रचि ०९
 छत्रपती शाहू महाराजांचा राजवाडा व वस्तुसंग्रहालय
प्रचि १०

प्रचि ११
 भवानी मंडप
प्रचि १२

प्रचि १३
 ज्योतिबाच्या नावानं चांगभल
प्रचि १४

प्रचि १५
 रंकाळा
प्रचि १६

प्रचि १७
 सिद्धगिरी म्युझियम, कणेरी मठ
कोल्हापूरहुन साधारण १५ किमी अंतरावर सिद्धगिरी म्युझियम, कणेरी मठ आहे. सदर म्युझियम तीन विभागात विभागले असुन पहिल्या विभागात प्राचीन भारतातील ऋषी व त्यांचे योगदान, दुस-या भागात ग्रामीण भागातील बारा बलुतेदारी, शेतकऱ्यांचे जीवन, विविध पारंपरिक खेळ, जुन्या पद्धतीची घरे अशा ग्रामीण संस्कृती व तिसर्‍या भागात भारतातील स्वातंत्र्यसैनिक इ. शिल्परूपात मांडले आहे.
(सिद्धगिरी म्युझियम मध्ये फोटोग्राफीला बंदी आहे. सदर फोटो आम्ही परवानगी घेऊन काढले आहेत.)
भारतातील ऋषी व त्यांचे योगदान
प्रचि १९
 गावातील पाणवठा आणि गावकरी
प्रचि २०
 सासरी निघालेली लेक
प्रचि २१
 गावातील जत्रा
प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५
 पन्हाळा
पन्हाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. तसेच पन्हाळा हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्याचे मुख्य गाव आहे.सध्या पन्हाळा हे एक पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. पन्हाळगड हा कोल्हापूर भागातील महत्त्वाचा किल्ला आहे. पन्हाळ्याला पर्णालदुर्ग देखील म्हणतात. मराठ्यांच्या उत्तरकालात आणि करवीर राज्य संस्थापनेच्या काळात मराठ्यांची काही काळ राजधानी असणारा हा किल्ला.
प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

प्रचि ४०

प्रचि ४१

Saturday, 3 June 2017

५२ दरवाजांचे शहर - "औरंगाबाद"



जगाच्या पर्यटक नकाशामध्ये ठळकपणे चमकणारी वेरूळ आणि अजिंठा हि दोन नावे म्हणजे मराठवाड्याच्या केंद्रस्थानी असलेल्या औरंगाबाद जिल्ह्याचे कंठमणीच. महाराष्ट्रात बर्‍याच ठिकाणी फिरलो पण विदर्भ आणि मराठवाडा राहिलेला. यावर्षी ऑफिसच्या कामासाठी फेब्रुवारी महिन्यात नागपुरला जाणे झाले आणि ऑगस्ट महिन्यात आलेल्या सलग सुट्ट्यांचा फायदा घेत औरंगाबाद भटकंतीचा बेत ठरवला. नेटवर सर्च करून आणि औरंगाबादच्या मायबोलीकर डॉ.मानसीताई (सरीवा) यांच्याकडुन अधिक माहिती घेऊन  ५ दिवसाचा (पुण्याहुन) बेत आखला गेला. मुंबईहुन मी, संदीप, समीर आणि पुण्याहुन दिपक त्याच्या कारसोबत असे ४ जण फिक्स झालो. प्रवासाचा बेत साधारण असा होता.

मुंबई - वाकड (पुणे) - रांजणगाव महागणपती - अहमदनगर मार्गे - देवगिरी किल्ला, वेरूळ लेणी, अजिंठा लेणी, बिबी का मकबरा, पाणचक्की, मराठवाडा विद्यापीठ (औरंगाबाद), जिजाऊ स्मृती (सिंदखेड राजा), लोणार सरोवर (बुलडाणा) - जायकवाडी धरण, संत एकनाथ समाधी मंदिर, संत एकनाथ वाडा, नाग घाट, पैठण - अहमदनगर मार्गे रांजणगाव महागणपती - वाकड (पुणे) - मुंबई.

दिवस पहिला-
सकाळी पाच वाजता वाकड (पुणे) हुन औरंगाबादला निघालो. साधारण १०:३० - ११ वाजता औरंगाबादला पोहचलो.
तासभर आराम करून देवगिरी किल्ला पाहिला.(पूर्ण दिवस)

दिवस दुसरा:-
सकाळी लवकर उठुन घृष्णेश्वर मंदिर, वेरूळची लेणी. संध्याकाळी ५ वाजता बिबी का मकबरा

दिवस तिसरा:
सकाळी लवकर उठुन बीड बायपास मार्गे लोणार सरोवर आणि संध्याकाळी पुन्हा औरंगाबाद परत.

दिवस चौथा :
अजिंठा लेणी (पूर्ण दिवस)

दिवस पाचवा :
औरंगाबाद - पैठण (जायकवाडी धरण, संत एकनाथ समाधी मंदिर, संत एकनाथ वाडा, नाग घाट) मार्गे पुणे व रात्री मुंबई.

प्रवासाचे साधनः- दिपकची कार

राहण्याचे ठिकाणः Tourist Home, औरंगाबाद रेल्वे स्टेशनजवळ, पैठण रोड.

राहण्याच्या खर्च- ७०० रू.प्रत्येक दिवसाचे Twin Sharing Basis, Non AC

औरंगाबादविषयी थोडे:-
औरंगाबाद हि साक्षात इतिहास नगरीच आहे. कोरीव लेण्यांच्या रूपाने ती इसवीसनपूर्वीचा इतिहास सांगते तर नंतरचा मुस्लीम राजवटींचा इतिहास आजही इथल्या ऐतिहासिक वास्तुंच्या रूपाने बोलत असतो. पश्चिम भारतातील चार बलाढ्य राजवंश म्हणजे सातवाहन, राष्ट्रकूट, यादव आणि अगदी शेवटीच्या मुस्लीम शाह्या. त्यांच्या राजधान्या अनुक्रमे पैठण (प्रतिष्ठान), वेरूळ (एलापूर), देवगिरी आणि शेवटी औरंगाबाद ह्या परिसरातच नांदल्या. त्यामुळे इतिहास ह्या नगरीच्या रोमारोमात भिनलेला जाणवतो. पूर्वी औरंगाबाद शहराला ५२ दरवाजे होते असे इतिहास सांगतो. त्यांची आठवण देत आजही दिल्ली गेट, भडकल गेट, पैठण गेट, मकई गेट इ. प्रशस्त प्रवेशद्वारे उभी आहेत.
अजिंठा, वेरूळ लेणी, बिबी का मकबरा, पाणचक्की, देवगिरी किल्ला, पैठण अशा विविध पर्यटन स्थळांनी नटलेल्या व ५२ दरवाजांचे शहर नावाने ओळखल्या जाण्यार्‍या या ऐतिहासिक नगरीचा हा छोटासा चित्र परिचय. Happy
अजिंठा लेणी
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०३

प्रचि ०४
 DCIM\100GOPRO\GOPR9588.वेरूळ लेणी
प्रचि ०६

प्रचि ०७
 DCIM\100GOPRO\GOPR9337.
प्रचि ०८
 DCIM\100GOPRO\GOPR9365.
प्रचि ०९

प्रचि १०

देवगिरी किल्ला (दौलताबाद)

प्रचि ११
 DCIM\100GOPRO\GOPR9240.
प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७
 बिबी का मकबरा
प्रचि १८

प्रचि १९
 DCIM\100GOPRO\GOPR9300.
प्रचि २०
 जायकवाडी धरण, पैठण
प्रचि २१
 DCIM\100GOPRO\GOPR9698.
पाणचक्की

प्रचि २२
 लोणार सरोवर
खरंतर लोणार सरोवर हे बुलडाण्या जिल्ह्यात येते पण औरंगाबाद भटकंतीत लोणार सरोवर समाविष्ट केल्याने त्याचेही प्रचि औरंगाबाद भटकंतीत देतोय.
प्रचि २३
 DCIM\100GOPRO\GOPR9399.
प्रचि २४
 औरंगाबादचा मशहुर तारा पानवाला
इतकं सुरेख पान या आधी कुठेच खाल्लं नाही. पान होतं की मलई. तोंडात टाकल्या टाकल्या विरघळलं. अगदी १० रू. पासुन ५००० रू. पर्यंतचे पान उपलब्ध आहे. औरंगाबाद भटकंतीत आवर्जुन भेट देण्याचे एक ठिकाण म्हणजे तारा पानवाला.
प्रचि २५
 खादाडी
औरंगाबाद परिसरात खादाडीची अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यात आम्ही भोज रेस्टॉरण्ट (अप्रतिम राजस्थानी थाळी), शेगाव कचोरी सेंटर, देवगिरीच्या रस्त्यावरील शेळकेमामा ढाबा (यातील शेवगा हंडी आणि फोडणी दिलेलं पिठलं अप्रतिम), फौजी ढाबा, सिंदखेड राजा गावच्या आधी एक छोटासा ढाबा आहे त्यातील शेव भाजी आणि वांग अप्रतिम. औरंगाबादला आलात आणि भोले शंकर चाटवाला येथे भेट न दिलीत तर तुमची औरंगाबाद भटकंती व्यर्थच. अप्रतिम चवीचं शेवपुरी, रगडा पॅटिस, भेळ इ. पदार्थ येथे मिळतात.
प्रचि २६
 शेवभाजी
प्रचि २७
 चला औरंगाबाद भटकंतीला
प्रचि २८

प्रचि २९
 DCIM\100GOPRO\GOPR9228.