Friday, 14 July 2017

मानवनिर्मित आश्चर्य - "अजिंठा लेणी" (औरंगाबाद)

प्रचि ०१

औरंगाबाद शहरापासुन अजिंठाला पोहचण्या आधी साधारण ८ किमी अंतरावर फर्दापुरच्या जवळ अजिंठा व्ह्यु पॉईंट आहे. आम्ही तेथुनच एका गाईडला घेऊन खाली उतरलो. त्यामुळे वाटेत वाघुरनदीचा उगम, सप्तकुंड पाहता आले आणि अजिंठा गुंफेचे विहंगम दृष्य बघता आले.
माहिती:
आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्राचीन अजिंठा-वेरूळची लेणी ही वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूट काळात निर्मिली गेली. ही लेणी त्यांच्यातील स्थापत्यकला, शिल्पकला व चित्रकलेसाठी जगप्रसिद्ध आहेत. प्रामुख्याने बौद्ध लेण्यांसाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण होय. औरंगाबाद पासून साधारण १०० कि.मी. वर हे स्थान आहे.सुमारे एक हजार वर्षे या ठिकाणी बौद्धांचे एक महत्वाचे केंद्र होते असे मानले जाते. वेरूळ हे भारतातील, पूर्वीच्या निजामाच्या हैदराबाद संस्थानातील व आताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातले गाव पाषाणातील कोरीव लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे. इ.स. १९८३ साली वेरूळ लेणी 'युनेस्को जागतिक वारसा स्थळ' म्हणून घोषित केली गेली.
प्राचीन भारतात धर्मशाळा, लेणी क्वचित मंदिरेसुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रय स्थान मिळावे असा असे. त्यांना राजाश्रय, धर्माश्रय व लोकाश्रय असे. अजिंठा गावाजवळची लेण्यांची निर्मितीही याच उद्देशातून सुरू झाली असावी. कालांतराने तिचे रूपांतर एका नितांतसुंदर अशा चित्रकला व शिल्पकला दालनांत झाले. मात्र या लेण्यांची मूळ रचना एखाद्या धार्मिक शिक्षणसंस्थेसारखी आहे. पुरातत्त्वशास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी दोन वेगवेगळ्या कालखंडात निर्माण केली गेली. ९, १०, १२, १३ व १५-अ ही लेणी हीनयान कालखंडात कोरली गेली असावीत. हा कालखंड साधारणतः इ.स.पूर्वीच्या दुसर्‍या शतकाच्या सुमारास सुरू झाला. या सगळ्या लेण्यांतून बुद्धाचे दर्शन स्तूप-रूपांत होते. ही सोडून १ ते २९ क्रमांकांची लेणी साधारणतः ८००-९०० वर्षांनंतर (इ.स.च्या सहाव्या व सातव्या शतकाच्या आसपास) महायान कालखंडात निर्माण केली गेलेली असावीत. या लेण्यांतून बुद्धाचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसून येते. महायान लेणी वाकाटक राजांचा राजवटीत निर्मिली गेली, त्यामुळे त्यांस एकेकाळी वाकाटक लेणी असेही संबोधले जाई. वाकाटक साम्राज्याच्या र्‍हासानंतर यांची निर्मिती अचानक थांबली व ही लेणी नियोजित भव्यतेपासून वंचितच राहिली.
अजिंठा येथे एकूण २९ लेणी आहेत. ही सर्व लेणी वाघूर नदीच्या आसपास विखुरलेली आहेत. ही लेणी नदीच्या पात्रापासून १५-३० मीटर (४०-१०० फूट) उंचीवर कातळात आहेत. हीनयान कालखंडातील लेण्यांपैकी ९ व १० क्रमांकाची लेणी ही चैत्यगृह।चैत्यगृहे आहेत व १२, १३ ही लेणी आणि १५-अ क्रमांकाचे लेणे विहार आहे. महायान कालखंडातील लेण्यांपैकी १९, २६ व २९ क्रमांकाची लेणी चैत्यगृहे असून १, २, ३, ५, ६, ७, ८, ११, १४, १५, १६, १७, १८, २०, २१, २२, २३, २४, २५, २७ व २८ क्रमांकाची लेणी विहार आहेत. विहार साधारणपणे चौरस आकाराचे असून त्यांची लांबी-रुंदी १७ मीटर (५२ फूट) पर्यंत आहे. हे विहार मुख्यत्वे भिक्षूंना राहण्यासाठी होते तर चैत्यगृहे हे पारंपरिक पूजाअर्चेसाठी वापरण्यात येत. कालांतराने विहारांतही मूर्तींची स्थापना झाली. बर्‍याच विहारांना सोपा व आंगण करण्यात आले व तेथे दगडात कलाकुसर व चित्रे काढण्यात आली.
(संदर्भः विकीपिडिया)
वाघुर नदीचा उगम, सप्तकुंड
प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०
 DCIM\100GOPRO\GOPR9469.
प्रचि ११
 DCIM\100GOPRO\GOPR9472.
प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५
 DCIM\100GOPRO\GOPR9582.
प्रचि २६
 DCIM\100GOPRO\GOPR9575.
प्रचि २७
 DCIM\100GOPRO\GOPR9587.
प्रचि २८

अवघा रंग एक झाला . . . (आनंदवारी २०१७)

पाहु द्या रे मज विठोबाचे रूप
लागलीसे भुक डोळा माझ्या . . .

 DCIM\100GOPRO\GOPR8497.JPGगळा दाटला अभंग घोष विठु रखुमाई
अनवाणी पाउलांना कष्ट जाणवे न काही
चंद्रभागेच्या तीराची ओढ लागली मनाला
दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला
घुमे गजर हरिनामाचा भक्त नामात रंगला...

शतकामागुन शतकं उलटली. पिढ्यांमागुन पिढ्या बदलल्या. बदलांचा हा रेटा गावांचे, माणसांचे चेहरे बदलतो. नवीन काही जन्माला येत, जुनं काही लयाला जातं. या सार्यामध्ये परंपरेची नाळ मात्र शाबूत असते. ती शतकांमागून शतकांना जोडत असते अन् पिढ्यांमागुन पिढ्यांना साधत असते. ही परंपराच मग एक सांस्कृतिक ठेवा बनते आणि जिवाभावाने जपली जाते. आपल्या महाराष्ट्रालाही असाच एक भव्य आणि उदात्त सांस्कृतिक ठेवा लाभला आहे. ज्ञानियाच्या ओव्यांचा, तुकोबा/नामदेवांच्या अभंगाचा आणि या गजरात न थकता चालणार्या "पंढरीच्या वारीचा".
यंदाच्या या आनंदवारीची हि काही क्षणचित्रे.
स्थळः श्री क्षेत्र पंढरपुर आणि वाखरी येथील रिंगण

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७
आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी
तुका म्हणे होय मनासी संवाद, अपुलाची वाद आपणासी


प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३
 गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा, हार मिरविती गळां
टाळ मृदुंग घाई पुष्प वर्षाव, अनुपम्य सुखसोहळा रे

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६
 DCIM\100GOPRO\G0028009.JPG
प्रचि १७
 DCIM\100GOPRO\G0078219.JPG
प्रचि १८
 DCIM\100GOPRO\G0078188.JPG
प्रचि १९
 DCIM\100GOPRO\GOPR8466.JPG
प्रचि २०
 DCIM\100GOPRO\GOPR8494.JPGखेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे
क्रोध अभिमान गेला पावटणी, एक एका लागतील पायी रे

प्रचि २१
 DCIM\100GOPRO\GOPR8462.JPG
प्रचि २२
 DCIM\100GOPRO\GOPR8461.JPG
प्रचि २३
 DCIM\100GOPRO\GOPR8246.JPG
प्रचि २४
 DCIM\100GOPRO\GOPR8240.JPG
प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७
 होतो जयजयकार गर्जत अंबर, मातले हे वैष्णव वीर रे
तुका म्हणे सोपी केली पायवाट, उतरावया भवसागर रे

प्रचि २८
 DCIM\100GOPRO\G0138353.JPG
प्रचि २९
 DCIM\100GOPRO\G0118294.JPG
प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६
 DCIM\100GOPRO\G0188521.JPG
प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

प्रचि ४०
 DCIM\100GOPRO\GOPR8925.JPGचालला गजर जाहलो अधिर लागली नजर कळसाला
पंचप्राण हे तल्लीन आता पाहीन पांडुरंगाला
देखिला कळस डोईला तुळस धावितो चंद्रभागेसी
समिप ही दिसे पंढरी याच मंदिरी माऊली माझी . . . .

प्रचि ४१

प्रचि ४२

प्रचि ४३

प्रचि ४४

प्रचि ४५

प्रचि ४६