Sunday, 8 June 2014

अबकी बार "रायलिंग पठार"

रंतर एप्रिल-मे महिन्यात सह्याद्रीतील भटकंती थोडी कमीच होते. पण यावर्षी मात्र मे महिन्याच्या सुरूवातीला सांदण दरी आणि शेवटी रायलिंग पठार अशी सोप्पी भटकंती झाली.
मुंबई-पुण्याहुन नसरापूर मार्गे वेल्हाच्या दिशेने राजगड, तोरणा यांना नमस्कार करत भट्टी मार्गे पासली या गावातुन केळद घाटातुन केळद खिंडीत पोहचल्यावर उजव्या बाजूला मोहरी या गावाकडे जाणारा रस्ता (?) आहे (याच रस्त्यावर एके ठिकाणी राजगड-तोरण्याचा संपूर्ण आकार नजरेस पडतो). रायलिंग पठारावर पोहचण्यासाठी आधी मोहरी गाव गाठावे लागते. मोहरी गावातून साधारण पाऊण एक तासाची वाटचाल केल्यानंतर आपण रायलिंग पठारावर पोहचतो. येथुन देखणा लिंगाणा आणि राजबिंड्या रायगडाचे दर्शन होते. घाट आणि कोकण यांना जोडणार्‍या सिंगापूर नाळ आणि बोराट्याची नाळेचा रस्ता देखील इथुनच आहे. लिंगाणा सर करणे ये अपने बस कि बात नही, सो रायलिंग पठारावरूनच यांचे रांगडे सौंदर्य टिपले. स्मित येथुन दिसणारा सह्याद्रीचा नजारा केवळ वर्णनातीत. समोर उभा असलेला देखणा लिंगाणा, त्याच्या मागे दुर्गदुर्गेश्वर रायगड, टकमक टोक इ., लिंगाण्याच्या पायथ्याशी असलेले पाने अन् दापोली ही छोटीशी गावं, कोकणदिवा आणि कावळय़ा-बावळय़ाची खिंड कितीही वेळा पाहिला तरी मन भरत नव्हते.
वृत्तांतात जास्त काहि लिहिण्यासारखे नाही, पण एक अनुभव मात्र शेअर करतो:
काजळ काळी गर्द रात अन् कंप कंप अंगात
सळसळणार्‍या पानांनाही रातकिड्याची साथ...

दोन-तीन दिवसांपूर्वी अमावस्या होऊन गेल्याने चांगलाच अंधार दाटलेला. साधारण नऊच्या दरम्यान गावातल्याच एका वाटाड्याला घेऊन आम्ही निघालो. वाट गर्द रानातून जात होती, त्यात तृतियेच्या चंद्रकोरीचा कितीसा तो उजेड? विजेर्‍यांच्या प्रकाशात चालत होतो. सोबत फक्त पानांची सळसळ आणि रातकिड्यांची किरकिर.घाटमाथ्यावर असल्याने हवेत किंचितसा गारवा होता पण सह्याद्रीतील चढउतारात आणि मे महिन्यामुळे अंगात घामाच्या धारा लागलेल्या. पुढे पुढे वाट अधिकच दाट झाडीतुन जाऊ लागली आणि अंधारातुन चालताना अचानक एका वळणावर......
एका झाडावर अगणित काजवे चमकताना दिसले. संपूर्ण झाड काजव्यांनी भरलेलं होतं. एकाच वेळी सगळ्या काजव्यांचे स्विच ऑन ऑफ होत होते. झाडासोबतच समोरची दरीही हजारो काजव्यांनी लखलखत होती. निसर्गाचा तो अद्भुत खेळ पाहताना भान हरपले. आयुष्यात पहिल्यांदाच हे सगळं पहात होतो, अनुभवत होतो. वर नभांगणात लाखो तारका तर इथे जमिनीवर हजारो काजवे लुकलुकतं होते. आयुष्यात एकदा तरी अनुभवावी अशी हि "लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया". मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या सुरूवातीला हा "काजवा महोत्सव" भरतो. हा सारा खेळ कॅमेर्‍यात साठवता आला नाही पण मनात मात्र कायमचा जपून ठेवला आहे.

ये रात ये खामोशी, ये ख्व़ाब से नज़ारें
जुगनू हैं या जमींपर उतरे हुए हैं तारें

Believe me कधीही विसरता येणार नाही असे दृष्य होते.
प्रचि ०१
वेल्ह्यामार्गे कुंबळे या गावी जाणारी "स्वारगेट-कुंबळे" एस्टी


प्रचि ०२

गरूडाचं घरटं - किल्ले तोरणा
प्रचि ०३

तोरणा किल्ल्यावरची बुधला माची
प्रचि ०४

किल्ले तोरणा आणि बुधला माची
प्रचि ०५

तोरणा-राजगड
प्रचि ०६

मोहरीगावाच्या दिशेने
प्रचि ०७

संधीप्रकाशातील लिंगाणा आणि किल्ले रायगडावरील टकमक टोक
प्रचि ०८

प्रचि ०९

मुंबईहुन साथ देणारी आमची स्विफ्टुकली मोहरी गावचा उंबरठा ओलांडण्यास राजी नव्हती. पायापडुन, मनधरणी करूनही ती पुढे येत नव्हती. उलट एकाच जागी उभी राहुन चाक गरागरा फिरवत आपला राग व्यक्त करत होती. सो स्विफ्टुकलीला तेथेच एका सुरक्षित जागी उभी करून १० मिनिटे चालत मोहरी गावात पोहचलो.
रागावलेली स्विफ्टुकली आणि मनधरणी करणारे आम्ही
प्रचि १०

SN=Singpore Naal & RP = Railing Pathar
प्रचि ११

रायलिंग पठार आणि लिंगाणा
प्रचि १२

प्रचि १३

आमचा टेन्ट
प्रचि १४

आकाशगंगा आणि टेन्ट
प्रचि १५

प्रचि १६

आकाशगंगा
प्रचि १७

सूर्योदय
प्रचि १८

प्रचि १९

विविध एंगलने लिंगाणा
प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

लिंगाण्याच्या पोटातील गुहा
प्रचि २८

लिंगाण्याचा माथा. या फोटोवरून कल्पना येईल कि लिंगाण्याच्या माथा गाठणे कुण्या येर्‍यागबाळ्याचे काम नव्हे.
प्रचि २९

कोकणदिवा
प्रचि ३०

आमचा टेन्ट
प्रचि ३१

आणि हा शेजार्‍यांचा टेन्ट स्मित
प्रचि ३२


मिलके भी हम ना मिले तुमसे न जाने क्यूँ
मीलों के हैं फ़ासले तुमसे न जाने क्यूँ
अनजाने हैं सिलसिले तुमसे न जाने क्यूँ
सपने हैं पलकों तले तुमसे न जाने क्यूँ
कैसे बतायें क्यूँ तुझको चाहें, यारा बता ना पाएँ....

प्रचि ३३
(रायलिंग पठारासंबंधित अधिक माहिती, नाश्ता जेवणाची सोय "सह्याद्री गुगल" अर्थात मायबोलीकर "सह्याद्रीमित्र" म्हणजेच ओंकार ओक याने करून दिली. याला कधीही, कुठेही आणि सह्याद्रीसंबंधित कुठलीही माहिती विचारा न कंटाळता सांगतो. अगदी किती किमी अंतरावर कुठले गाव आहे, त्याच्यानंतर किती मीटरवर कुठला टर्न आहे, गावचा सरपंच कोण आहे, त्याचा मोबाईल नंबर सगळं ह्याला तोंडपाठ. म्हणुन सह्याद्रीत कुठे भटकायला जायचे असले तर गूगलवर सर्च करत बसण्यापेक्षा सरळ ओंकारला एक फोन करतो. सगळी माहिती क्षणात मिळते. मनापासुन धन्यवाद रे ओंकार).

No comments:

Post a Comment