Thursday, 19 February 2015

राजियांचा गड...

सह्याद्री - इथल्या मातीचे ढेकुळ पाण्यात टाका, जो तवंग उमटेल तो इतिहासाचाच. वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, वेडी माणसंच इतिहास घडवतात. देव, देश आणि धर्मासाठी हातात प्राण घेणार्‍या वेड्यांचा हा महाराष्ट्र. अशा या ध्येयवेडाने झपाटलेल्या महाराष्ट्रात जन्म झाला एका नरसिंहाचा आणि ते नरसिंह होते "छत्रपती शिवराय". शिवजयंती निमित्त श्री छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा

पराक्रमाने स्वराज्यांगणी तेजकार्य घडविले
कौशल्याने शब्दकोंदणी अतुल शौर्य जडविले
समर्थ दर्शन करी अरिमर्दने तिमिरहरण रविराज
रचितो वर्णन, करीतो वंदन शिवभूषण कविराज!!
"राजगड" स्वराज्याची पहिली राजधानी. बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदवी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. राजगडाचं सभासद बखरीमधील अजून एक नाव म्हणजे मुरबाद डोंगर (मुरुंबदेव डोंगर). मावळ भागामध्ये राज्यविस्तार साध्य करण्यासाठी राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले मोक्याच्या ठिकाणी होते. तोरणा जरी अभेद्य असला तरी बालेकिल्ला आकारने लहान असल्याने राजकीय केंद्र म्हणुन हा किल्ला सोयीचा नव्हता. त्यामानाने राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला तोरणापेक्षा मोठा आहे. सन १६४६ ते १६४७ दरम्यान शिवरायांनी तोरणा किल्ल्यासोबतच राजगड किल्ला जिंकू घेतला. हा किल्ला बांधण्याचे काम महाराजांनी झपाट्याने सुरु केले. त्या डोंगरास तीन सोंडा किंवा माच्या होत्या त्यासही तटबंदी केली. मुख्य किल्ल्यास राजगड नाव ठेवून एक इमारत उभी केली. तीन माच्यांना सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती ही नावे दिली.
अफजलखानाविरुद्ध रचलेली व्युहरचना, तानाजींनी 'आधी लगीन कोंडाण्याचे' म्हणत आखलेली सिहंगड मोहीम, आग्रावारीहून गोसाव्याचे रुप घेउन सुखरुप आलेले महाराज, अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षिदार असलेल्या ह्या गडावरूनच स्वराज्याची जडण घडण सुरु होती. जवळपास वीसपंचवीस वर्षे शिवाजीराजांचे इथे वास्तव्य होते..
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

चोर दरवाजा वाट
प्रचि ०४

पाली दरवाजा
प्रचि ०५

गुंजवणे दरवाजा
प्रचि ०६

पद्मावती तलाव
प्रचि ०७

पद्मावती देवी
प्रचि ०८

पद्मावती माची
प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

महाराणी सईबाईंची समाधी
प्रचि १२

सुवेळा माची
प्रचि १३

राजगडावरील सूर्योदय
प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

चिलखती बुरूज आणि सुवेळा माची
प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

नेढं
प्रचि २१

बालेकिल्ला
प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

संजीवनी माची
प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

Monday, 16 February 2015

"Flame of the Forest" - किंशुक आणि परिभद्र

पळस (Butea monosperma)
पयसाची लाल फुलं, हिरवे पान गेले झडी
विसरले चोची मिठू, गेले कोठी उडी

पाच पाकळ्यापैकी एक मोठी कळी व ती थेट पोपटाच्या चोचीसारखी बाकदार असते. या झाडाकडे बघुन शुकच कि काय, असा प्रश्न पडला असेल म्हणुन याचे संस्कृत नाव, किंशुक. ( किं शुकः ?) आणि म्हणुनच कि काय कवियत्री बहिणाबाईंना वरील ओळी सुचल्या असाव्यात. होळीच्या सुमारास जंगलात गेलात तर पळसाची अनेक झाडे चंदेरी भगव्या फुलानी सजलेली दिसतात. याचे झाड तसे लहानखुरेच असते. फांद्या काळ्या रंगाच्या आणि वेड्यावाकड्या वाढलेल्या असतात. एरवी जाडसर त्रिदलीय पानानी बहरलेला वृक्ष डिसेंबरमधे मात्र वेड्यावाकड्या काळ्या फांद्यांमुळे अगदीच कुरुप दिसतो. जानेवारीच्या शेवटी यावर जाडसर काळ्या कळ्या येतात, आणि फ़ेब्रुवारी मार्चमधे हे सगळे झाड फुलानी भरुन जाते. याच्या पाकळ्यावर सुक्ष्म लव असते, त्यामुळे या केशरी रंगाला एक चंदेरी छटा येते, आणि त्याचमुळे काहि कोनातुन बघितल्यास हे झाड चमकते. या फुलातला मकरंद चाखण्यासाठी शिंजिर, सुर्यपक्षी, मैना आदी पक्ष्यांची लगबग चाललेली असते. त्यावर येणार्‍या मधमाश्या खाण्यासाठी वेडा राघु पण ईथे घुटमळत असतो. आणि या सगळ्यांच्या गोंगाटानी हे झाड गजबजत असते. फुलांच्या पाकळ्याचा सडा झाडाखाली पडलेला असतो. या पाकळ्या रात्रभर पाण्यात ठेवुन कुस्करल्या कि सुंदर केशरी रंग तयार होतो. कपडे रंगवायला तो उपयोगी असतोच, पण नेमके रंगपंचमीचे निमित्त साधल्याने, नैसर्गिक आणि सुरक्षित रंगहि मिळतो.







पांगारा ( Erythrinaa variegata)
पळसाच्या आगेमागे जंगलात परिभद्र फुलत असतो. या झाडाचे इंग्लिश नाव एरिथिना इंडिका. एरिथ्रिनाचा अर्थच मुळी रक्तवर्णाचा, असा होता. इंडिका म्हणजे भारताचा. याचे शास्त्रीय नाव Erythrinaa variegata . ग्रीष्माचा दाह जाणवु लागला. सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरले, झाडांच्या पानाना मरणकळा लागली, कि नेमका पांगारा फ़ुलु लागतो.
आपल्याकडे अगदी नैसर्गिकरित्या वाढतो हा. या झाडाचे खोड पांढरट रंगाचे असते, आणि पाने पळसासारखीच त्रिदलीय. पण त्यापेक्षा पातळ. याची हिरवीपिवळी नक्षीची पाने असलेली एक जात आता शोभेसाठी लावली जाते. ती मुद्दाम तयार केलेली नाही. निर्गातच ती तयार होते. तिला ओरिएंटालिस किंवा पार्सेली असे म्हणतात. एरवी याच्या पानाना तितकी शोभा नसते. तरिही हे झाड कायम नीटनेटके दिसते. अगदी पानगळ झालेली असली तरीही निष्पर्ण फांद्याहि सुरेख दिसतात. असे रुप फार दिवस नसतेच. लगेच हे झाड लालभडक फ़ुलानी भरुन जाते. इंदिरा संतानी त्यांच्या मृदगंध कवितेत, याला सुर्योपासक म्हंटले आहे. याच्या फ़ुलात तशी एकच पाकळी मोठी असते. बाकिच्या चार अगदीच छोट्या. यातले पुंकेसरहि तसेच लालभडक.