पळस (Butea monosperma)
पयसाची लाल फुलं, हिरवे पान गेले झडी
विसरले चोची मिठू, गेले कोठी उडी
पाच पाकळ्यापैकी एक मोठी कळी व ती थेट पोपटाच्या चोचीसारखी बाकदार असते. या झाडाकडे बघुन शुकच कि काय, असा प्रश्न पडला असेल म्हणुन याचे संस्कृत नाव, किंशुक. ( किं शुकः ?) आणि म्हणुनच कि काय कवियत्री बहिणाबाईंना वरील ओळी सुचल्या असाव्यात. होळीच्या सुमारास जंगलात गेलात तर पळसाची अनेक झाडे चंदेरी भगव्या फुलानी सजलेली दिसतात. याचे झाड तसे लहानखुरेच असते. फांद्या काळ्या रंगाच्या आणि वेड्यावाकड्या वाढलेल्या असतात. एरवी जाडसर त्रिदलीय पानानी बहरलेला वृक्ष डिसेंबरमधे मात्र वेड्यावाकड्या काळ्या फांद्यांमुळे अगदीच कुरुप दिसतो. जानेवारीच्या शेवटी यावर जाडसर काळ्या कळ्या येतात, आणि फ़ेब्रुवारी मार्चमधे हे सगळे झाड फुलानी भरुन जाते. याच्या पाकळ्यावर सुक्ष्म लव असते, त्यामुळे या केशरी रंगाला एक चंदेरी छटा येते, आणि त्याचमुळे काहि कोनातुन बघितल्यास हे झाड चमकते. या फुलातला मकरंद चाखण्यासाठी शिंजिर, सुर्यपक्षी, मैना आदी पक्ष्यांची लगबग चाललेली असते. त्यावर येणार्या मधमाश्या खाण्यासाठी वेडा राघु पण ईथे घुटमळत असतो. आणि या सगळ्यांच्या गोंगाटानी हे झाड गजबजत असते. फुलांच्या पाकळ्याचा सडा झाडाखाली पडलेला असतो. या पाकळ्या रात्रभर पाण्यात ठेवुन कुस्करल्या कि सुंदर केशरी रंग तयार होतो. कपडे रंगवायला तो उपयोगी असतोच, पण नेमके रंगपंचमीचे निमित्त साधल्याने, नैसर्गिक आणि सुरक्षित रंगहि मिळतो.
पांगारा ( Erythrinaa variegata)
पळसाच्या आगेमागे जंगलात परिभद्र फुलत असतो. या झाडाचे इंग्लिश नाव एरिथिना इंडिका. एरिथ्रिनाचा अर्थच मुळी रक्तवर्णाचा, असा होता. इंडिका म्हणजे भारताचा. याचे शास्त्रीय नाव Erythrinaa variegata . ग्रीष्माचा दाह जाणवु लागला. सगळीकडे धुळीचे साम्राज्य पसरले, झाडांच्या पानाना मरणकळा लागली, कि नेमका पांगारा फ़ुलु लागतो.
आपल्याकडे अगदी नैसर्गिकरित्या वाढतो हा. या झाडाचे खोड पांढरट रंगाचे असते, आणि पाने पळसासारखीच त्रिदलीय. पण त्यापेक्षा पातळ. याची हिरवीपिवळी नक्षीची पाने असलेली एक जात आता शोभेसाठी लावली जाते. ती मुद्दाम तयार केलेली नाही. निर्गातच ती तयार होते. तिला ओरिएंटालिस किंवा पार्सेली असे म्हणतात. एरवी याच्या पानाना तितकी शोभा नसते. तरिही हे झाड कायम नीटनेटके दिसते. अगदी पानगळ झालेली असली तरीही निष्पर्ण फांद्याहि सुरेख दिसतात. असे रुप फार दिवस नसतेच. लगेच हे झाड लालभडक फ़ुलानी भरुन जाते. इंदिरा संतानी त्यांच्या मृदगंध कवितेत, याला सुर्योपासक म्हंटले आहे. याच्या फ़ुलात तशी एकच पाकळी मोठी असते. बाकिच्या चार अगदीच छोट्या. यातले पुंकेसरहि तसेच लालभडक.

No comments:
Post a Comment