Monday, 4 January 2016

पर्यटनाचे आगर - "गुहागर"

डिसेंबर महिन्यात आलेल्या सलग सुट्टीचा फायदा घेत व २०१५ वर्षात कमी ठिकाणी झालेल्या भटकंतीचा बॅकलॉग भरण्यासाठी ४ दिवसांची गुहागर भटकंती करून आलो. मुंबई - पुणे - सातारा - उंब्रज - पाटण - कोयनानगर - कुंभार्ली घाट - चिपळुण - गुहागर - वेळणेश्वर - हेदवी - राई-भातगाव मार्गे गणपतीपुळे - जयगड - तवसाळ - अंजनवेल - गोपाळगड - गुहागर - चिपळुण - कुंभार्ली घाट - पाटण - दातेगड किल्ला - सडा वाघापुर मार्गे सातारा - शेरे लिंब येथील "बारा मोटेची विहिर" - बावधन (वाई) - पुणे - मुंबई असा भरगच्च कार्यक्रम होता. स्मित सदर भटकंतीचा हा चित्र वृत्तांत. स्मित
प्रचि ०१


हेदवीचा श्री दशभुज लक्ष्मीगणेश
महाराष्ट्रातील जागृत अष्टविनायकांसारखेच कोकणातही काही जागृत गणेशाचे मंदिर आहेत ज्यांना अप्रतिम निसर्गाची पार्श्वभूमी लाभली आहे. असेच एक सुंदर व जागृत गणेशाचे स्थान म्हणजेच हेदवी येथील श्री दशभुज लक्ष्मीगणेश मंदिर. निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या गुहागर तालुक्यातेल हेदवी गावच्या कुशीत डोंगराच्या मध्यभागी किल्लेवजा तटबंदीने वेढलेली पेशवेकालीन भव्य अशी हि वास्तु. मंदिर हे एक टेकडीवर वसले असून गाडिने थेट तेथपर्यंत पोहचता येते. मंदिर परिसरात असलेली गर्द आमराई, शांत व मन प्रसन्न करणारे वातावरण, विविध फळा फुलांच्या बागा यामुळे येथे येणारा भाविक हेदवीच्या दशभुज लक्ष्मीगणेश मंदिराच्या व येथल्या परिसराच्या प्रेमात न पडला तर नवलच. गुहागर तालुक्यापासून अंदाजे २०-२१ किमी अंतरावर वसले आहे हे हेदवी गाव. पूर्वी हे गाव जास्त प्रसिद्ध नव्हते मात्र दहा हात असलेली सुंदर व दुर्मिळ अशी संगमरवरी मूर्ती व नवसाला पावणाऱ्या या गणेशाच्या दर्शनासाठी येणारे गणेशभक्त आणि पर्यटक यांच्यामुळे हा परिसर आता गजबजू लागला आहे.

श्री दशभुज गणेशाचे हेदवी गावात आगमन कसे झाले त्याबद्दल असे सांगण्यात येते कि, पेशवेकाळात केळकर स्वामी नावाचे एक गणेशभक्त येथे राहत होते. त्यांनी पेशवे यांची पुणे येथे भेट घेतली. केळकर स्वामींनी पेशव्यांच्याबाबतीत वर्तविलेल्या काही घटनांची साक्ष पटल्यामुळे पेशव्यांनी त्यांना मंदिराच्या उभारणीसाठी त्याकाळी १ लाख रुपये दिले. त्या पैशातून केळकर स्वामींनी हेदवी येथे हे मंदिर उभारले.मंदिरातील मूर्ती हि काश्मीरमधील पांढर्‍या पाषाणापासून घडवलेली आहे. मूर्तीला दहा हात असून उजव्या बाजुला पहिल्या हातात चक्र, दुसऱ्या हातात त्रिशुळ, तिसऱ्या हातात धनुष्य, चौथ्या हातात गदा व पाचव्या हातात महाळुंग नावाचे फळ आहे. डाव्या बाजुच्या पहिल्या हातात कमळ, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात निलकमळ, चौथ्या हातात दात व पाचव्या हातात धान्याची लोंब आहे. मूर्तीच्या डाव्या मांडीवर अष्टसिद्धीपैकी एक सिद्धलक्ष्मी बसलेली आहे. मूर्ती डाव्या सोंडेची असून सोंडेमध्ये अमृतकुंभ धरलेला आहे. या गणेशमूर्तीची उंची साडेतीन फूट आहे व ती एका मोठ्या आसनावर विराजमान झालेली आहे. मूर्तीचे डोळे काळेभोर असून अत्यंत रेखीव आहेत. मंदिरात कोठेही उभे राहून दर्शन घेतले असता ती आपल्याकडेच पाहत आहे असे भासते. गळ्यात नागाचे जानवे परिधान केलेली अशी हि दशभुजा गणेश मूर्ती फक्त नेपाळ मध्येच पाहावयास मिळते असे म्हटले जाते. अशी हि भक्तांच्या हाकेला धावणारी वैशिष्यपूर्ण मूर्ती संपूर्ण भारतात एकमेव आहे. अशा प्रकारच्या शस्त्रसज्ज मूर्ती पुजायचा अधिकार केवळ सेनेचे अधिपत्य करणार्‍यांनाच असतो असा पूर्वापार संकेत आहे. त्यामुळे पेशवेकाळात अशा मूर्त्या फार कमी तयार केल्या गेल्या. मंदिराच्या उजव्या कोनाडयात असलेली लक्ष्मी विष्णुची मूर्ती हि विशेष रुपातली आहे. मूर्तीच्या बाजुला जय-विजय असून मूर्ती गरुडारुढ आहे. याचा अर्थ असा कि श्री विष्णू भगवान भक्ताची हाक ऐकताच त्याच्या मदतीला जाण्यास सिद्ध आहे. टप्याटप्याने जिर्णोद्धार करण्यात आलेल्या या मंदिरात भाद्रपद व माघी गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. दर संकष्टी व विनायक चतुर्थीला येथे भाविकांची गर्दी असते. अशा या निसर्गरम्य हेदवी गावास स्वच्छ व सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. येथे आपल्याला पर्यटन व तिर्थाटन या दोन्हीचा लाभ घेता येतो.

श्री उमा महेश्वर मंदिर – हेदवीच्या समुद्रकिनारी डोंगराच्या पायथ्याशी उमा महेश्वराचे मंदिर आहे. १७७० ते १७८० दरम्यान अहिल्याबाई होळकरांनी दिलेल्या देणगीतून हे मंदिर उभारल्याचे सांगितले जाते. समुद्रकिनारी खडकाळ भागात थोड्या उंचीवर असलेल्या या मंदिरापर्यंत भरतीचे पाणी येते. गाभार्‍यात एक शिवलिंग असून मंदिराजवळच एक गोड्या पाण्याचे कुंडदेखील आहे.

असे हे लक्ष्मीगणेशाचे सुंदर मंदिर समुद्राजवळच असल्याने समुद्राची गाज ऐकत आपल्या मनातील भक्तीभावाला साद घालण्याचा आनंद अवर्णनीय असतो आणि तो अनुभवण्यासाठी एकदा तरी हेदवीला अवश्य भेट द्या.

श्री दशभुज लक्ष्मीगणेश






हेदवीची सुप्रसिद्ध बामणघळ
प्रचि ०३
हेदवीचा किनारा हा स्वच्छ असून सुरक्षित आहे. उमा महेश्वर मंदिराच्या बाजुने डोंगराच्याकडेने चालत गेल्यास पुढे खडकात पडलेली एक मोठी भेग दिसते. ऐन भरतीच्या वेळेस येथे उंच उसळलेली लाट आपले स्वागत करते. डोंगरावर वर्षानुवर्षे समुद्राचे पाणी आदळून एक अरुंद घळ तयार झाले आहे. हिच ती सुप्रसिद्ध "बामणघळ". येथील पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही त्यामुळे जरा जपुनच!

प्रचि ०४

हेदवीचा निसर्गरम्य समुद्रकिनारा
प्रचि ०५

प्रचि ०६

उफराटा (उरफाटा) गणपती मंदिर (गुहागर)
प्रचि ०७
खवळलेल्या समुद्राच्या प्रकोपापासुन गुहागरला वाचवण्यासाठी, एका भक्ताच्या हाकेला श्री गणपती धावून आला. पूर्वाभिमुख असलेल्या गजाननाने आपले मुख वळवून सागराकडे म्हणजेच पश्चिमाभिमुख केले. समुद्र शांत झाला व गुहागरचे संरक्षण झाले. दिशा संपूर्ण बदलली (उफराटी) म्हणुन "उफराटा गणपती". (आख्यायिका)

गुहागरचा समुद्रकिनारा
प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

वेळणेश्वर
प्रचि ११



श्री वेळणेश्वर

दुर्गादेवी मंदिर
प्रचि १२

प्रचि १३

राई-भातगाव पूल
प्रचि १४
गुहागर तालुक्यातील टोकाचे गाव भातगाव व रत्नागिरी तालुक्यातील राई या गावांना जोडणारा पूल. या पुलामुळे गणपतीपुळे, जयगड, या स्थळांना भेट देऊन रत्नागिरीस जाणे सुलभ झाले.

प्रचि १५

जयगडची खाडी
प्रचि १६

प्रचि १७

रोहिले गाव
हेदवीच्या पुढे तवसाळला जाणार्‍या रस्तावर "रोहिले" नावाचे गुहागर तालुक्यातील क्षेत्रफळाने सर्वात छोटे असलेले गाव वसले आहे.
प्रचि १८

प्रचि १९

तवसाळचा समुद्रकिनारा
प्रचि २०

तवसाळ - जयगड फेरी बोट
प्रचि २१
तवसाळहुन अगदी ४०-४५ मिनिटात आपल्या गाडीसहित जयगडला पोहचत येते आणि तेथुन पुढे कर्‍हाटेश्वर, मालगुंड गावांना भेट देत गणपतीपुळ्यास कमी वेळात जाता येते. स्मित (राई-भातगावहुन जाकादेवी मार्गे गणपतीपुळे तर तवसाळ-जयगड फेरीबोटीने मालगुंड मार्गे गणपतीपुळे)

प्रचि २२

प्रचि २३

जयगड किल्ल्याचा उपदुर्ग "विजयगड"
प्रचि २४

गोपाळगड
प्रचि २५

प्रचि २६

टाळकेश्वर दीपगृह
गोपाळगडाच्या जवळच दीपगृह आणि टाळकेश्वर मंदिर आहे. येथील कर्मचार्‍यांच्या परवानगीने दीपगृह पाहता येते. संध्याकाळी ५ पर्यंत दीपगृह पाहता येते.
प्रचि २७

प्रचि २८

टाळकेश्वर मंदिर
प्रचि २९

अंजनवेल येथील बहुचर्चित एनरॉन प्रकल्प
प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

आंबेमोहर
प्रचि ३४

प्रचि ३५

बकुळ
प्रचि ३६

अंजनवेल येथील "अंजन वेल" स्मित
प्रचि ३७

चांडाळ चौकडी स्मित
प्रचि ३८

तळटीपः
 वरील काही माहिती "पराग पिंपळे" यांच्या "साद सागराची गुहागर-वेळणेश्वर-हेदवी" या पुस्तकातुन. गुहागर भटकंतीसाठी (रादर को़कण भटकंतीसाठी) अतिशय उपयुक्त पुस्तक आहे. स्मित

No comments:

Post a Comment